छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी
छत्रपती शिवाजी महाराज:
शिवाजी! नावासारखे नाव. फक्त तीन अक्षरे.पण तीन शतके उलटून गेल्यावरही ही तीन अक्षरे आपल्या कानावर पडल्याबरोबर आपल्या हृदयाची स्पंदने आनंदाने आणि अभिमानीने उत्तेजित होतात. आपल्या नसानसातून रक्ताचा प्रवाह युद्धाच्या चौकरू उधळलेल्या घोड्याप्रमाणे वेगाने आणि आवेगाने जे पाहू लागतो! काय जादू आहे या तीन अक्षरांमध्ये.
ती जादू आहे, एका नैतिक आणि निरामय चरित्राचे!! तो माणसा माणसांना झपाटून टाकणारा प्रभाव आहे. विलक्षण सामर्थ्य आणि सुलक्षण शील यांच्या समन्वयाचा.
एखादा मनुष्य शेकडो वर्ष लोकांच्या काळजावर प्रेमाने इतके भावपूर्ण आदी राज्य गाजवतो तेव्हा ती घटना हा काही एखादा योगायोग नसतो. हे सगळे काही आपोआप घडत नसते. शिवरायांचे व्यक्तिमत्व कर्तुत्वाच्या अदृश्य शिखरावर विराजमान झालेले होते. त्यास कारण होते त्यांच्या अंगी असलेले असामान्य गुण.
छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी:
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे समस्त मराठी मुलखाचे नव्हे तर अखिल भारत वर्षाचे प्रेरणास्थान. आजच्या मराठी समाजाचे व संस्कृतीचे मूळ अधिष्ठान शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यात पाहायला मिळते. साडेतीनशे वर्षांपूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपल्या मायभूमीच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेतला आणि मोठ्या जिद्दीने तसेच पराक्रमाने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी निर्माण केलेले राज्य हे काही वतनदाराच्या अथवा जहागीरदारांच्या सुख-समृद्धीसाठी नव्हती तर ती सामान्य रयतेच्या कल्याणासाठी स्थापन झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याच्या प्रशासनासाठी निर्माण केलेले दंडक आजही लोकशाहीच्या युगात प्रेरणादायी आणि आदर्श ठरावेत असे होते.
शिवाजीराजा हा काही सामान्य सरदार जहागीरदाराचा पुत्र नव्हे तो दक्षिणेतील एका बलाढ्य सेनानीचा ज्याने आपल्या लष्करी व राजनैतिक सामर्थ्याने नवी शाहीच निर्माण केली अशा मुद्दे पुरुषाचा पुत्र होता.छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार करणारे त्यांचे माता पिता ही खूप गुणसंपन्न व सुसंस्कृत होते तसेच त्यांनी आपल्या पुत्राचे व्यक्तिमत्व ही घडवले. बंगळुरू मुक्कामी वयाच्या सातव्या वर्षी शिवरायांचे शिक्षण सुरू झाले. बाराव्या वर्षापर्यंत त्यांना अनेक विद्या व शास्त्रांची शिक्षण दिले गेले. पुणे येथे मुक्कामास असताना शिवाजी राजे यांना उच्च प्रतीचे शिक्षण दिले गेले. वेगवेगळे शास्त्र व अभ्यास शिकवले गेले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्य कारभार :
शिवाजी महाराजांचे पराक्रम इतके अद्भुत वाटतात की त्यामुळे त्यांच्या ठिकाणी राज्यकर्ता म्हणून असणाऱ्या असामान्य गुणांचा विसर पडतो. पहिल्या नेपोलियन प्रमाणे आपल्या काळात शिवाजी हा महान संघटनाकार आणि प्रजेच्या जीवनाला उपयोगी पडणाऱ्या संस्थाचा विधाता होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी हरमलेली चळवळ बहुतांशी यशस्वी झाली. त्यांच्या मागून थोड्याच वर्षांनी देशावर जे अनेक संकटी कोसळली तिच्यातून देश सुरक्षित पार पडला हा त्याच्या पूर्वक्तो कर्तुत्वाचा परिणाम होता.त्यामुळेच तर मोगल साम्राज्याच्या सर्वसामर्थ्याशी वीस वर्षे जगडून त्यांनी आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचा हक्क सिद्ध केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे लष्करी व मुलकी राज्य कारभार :
शिवरायांच्या या व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा दंडक म्हणजे राज्यात कोणाही मुलगी अथवा लष्करी जहांगीर न देता त्यास सर्व रोकड स्वरूपात खजिन्यातून वेतन देण्याची पद्धत त्यांनी स्वीकारली. आणि त्याचा परिणाम म्हणजे शेवटपर्यंत अखंड राहिलेले स्वराज्य होय.छत्रपती शिवाजी महाराजांचे शील अत्यंत चरित्रसंपन्न होते . ज्या पुरुषास कधीही कोणतेही दुर्वेशन शिवले नाही.ज्याने परस्त्रीस मातेसमान मानले. ज्याने स्व-धर्माप्रमाणेच पर धर्मास आदर दाखवला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे अतुलनीय युद्धकौशल्य :
छत्रपती शिवाजी महाराज,ज्याने युद्धात पाडव केलेल्या शत्रूच्या लोकास त्यांच्या जखमा बऱ्या करून स्वग्रही पोहोचवले. ज्याने फौज,किल्ले,आरमार इत्यादी योजनांनी स्वदेश संरक्षणाची योग्य तजवीज करून ठेवली. जाने स्वतःसाठी संकटात उडी घेऊन आपल्या लोकसभेची सेवा करण्यास शिकवले. ज्याने अनेक जीवावरच्या प्रसंगी केवळ बुद्धी सामर्थ्याने स्वतःचा बचाव केला. ज्याने औरंगजेबासारख्या प्रताप विभाजनाचे भगीरथ प्रयत्न सतत तीस वर्षे पावेतो यत्किंचित चालू दिले नाही, इतकेच नव्हे तर अनेक राज्यांचा पाढा करून अखिल भारत खंडात अपूर्ण असे स्वराष्ट्राचे स्वतंत्र राज्य स्थापन करून त्याची कीर्ती,पृथ्वीवर आजरामर करून ठेवली. पुण्यात प्रत्यक्ष राहत्या वाड्यात पाच वर्ष औरंगजेबाचे सुविधा तळ देऊन बसले तेव्हा त्याची ती मगर मिठी सुरतेचे नाक दाबून मोठ्या व्यक्तीने शिवाजी महाराजांनी सोडविले.
छत्रपती शिवाजी महाराज आधुनिक काळाचा अद्वितीय राज्य संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराज हे न्यायासाठी कोणाची भीड मुवर्त न धरणारे होते. दृष्टांचा काळ पण गरिबाचा कनवाळू, एकंदर रयतेस पोटाच्या मुलाप्रमाणे वागवणारा, सदैव सावध व उद्योगी, नेहमी मातेच्या अर्ध्या वचनात राहून अहर्निश राष्ट्राची चिंता वाहणारा,स्वदेश व स्वभाषा व सुधर्म या विविध संपत्तीचे संगोपन करणारा पापभीरू, परंतु रणशूर असा हा आधुनिक काळाचा अद्वितीय राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, प्राचीन पुण्यश्लोकांच्या पंक्तीत बसण्यास सदैव पात्र आहे.एखादा समर्थन पुरुष प्रदीर्घ व संकट निद्रीतून जागा व्हावा आणि शक्तिमान व्यक्ती म्हणून उभा राहावा त्यात प्रमाणे मराठी जनता शिवाजींनी निर्माण केलेल्या स्वराज्याची सामूहिक प्रेरणा घेऊन उभी राहिली. शिवाजी यशस्वी झाला कारण तो राजा म्हणून लोकांचा नायक होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी असलेले लोकशाहीचे महत्त्वाचे तत्त्व :
जेव्हा जात पात पंत वंश याचा विचार न करता, उत्तम माणसे लोकसेवेसाठी निवडले जातात तेव्हाच लोक कल्याण साधले जाते. याच तत्वाचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता गुणवाण लोकांना स्वराज्य कामे जोडण्याची कार्य शिवरायांनी केले. केवळ क्षमता व गुणवत्ता पाहूनच त्यांनी त्यांची नेमणूक केली. म्हणूनच शिवाजी हा भरजरी पोशाखात रत्नजडित सिंहासनावर विराजमान होत असला तरी तो खऱ्या अर्थाने वैराग्यशाली ऋषी होता.प्राचीन हिंदू राजनीति मधील आदर्श अशा राजपदास तो पोहोचला होता.आणीबाणीच्या प्रसंगी त्यांचे उत्कृष्ट अष्टपैलूत्व प्रकट होत असे. शत्रूची कपट,फसवणूक, गुप्त करस्तान यांना राजाने कधीही दाद दिली नाही,उलट पक्षी आपल्या जाळ्यात शत्रूला पकडण्यात ते यशस्वी ठरले.
काळाच्या पुढे जाणारा तो एक दृष्टा महापुरुष होता, म्हणूनच इंग्रजांनी या राजाचे वर्णन “The greatest diplomat of Easten parts“असे केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज फोटो
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म आणि बालपण :
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे विजापूरच्या सुलतानाकडे सैन्यामध्ये सेनापती होते. तर महाराजांच्या आई या सिंदखेडच्या जाधव कुळामध्ये जन्मलेल्या अत्यंत प्रतिभावान वीरमाता होत्या.
शिवनेरी किल्ल्यावर असलेल्या शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी हे नाव देण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण जिजामाता यांच्या मार्गदर्शनाखाली घडले. राजकारण,युद्ध व विविध शास्त्राचे ज्ञान शिवरायांना बालपणीच मिळाले. बालपणी आपल्या सवंगड्या बरोबर वेगवेगळे खेळ खेळत असतानाच शिवरायांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली.
तुम्ही वाचू शकता :Swami Vivekanand Mahiti in Marathi( स्वामी विवेकानंद माहिती मराठीतून )
FAQ
प्रश्न :छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी केंव्हा असते?
उत्तर :छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 50 व्या वर्षी 3 एप्रिल 1680 रोजी आपला देह ठेवला. म्हणून 3 एप्रिल हा दिवस दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथीचा दिवस म्हणून साजरा करतात.
प्रश्न :छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक केंव्हा व कोठे झाला?
उत्तर : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर 1674 साली झाला. त्या सालापासून महाराजांनी “राज्याभिषेक” हा शक सुरू केला. छत्रपती शिवाजी महाराज हे “शककर्ते” झाले.
प्रश्न :छत्रपती शिवाजी महाराज जयंती केंव्हा साजरी केली जाते?
उत्तर : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार 19 फेब्रुवारी रोजी तर तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीयेला करतात.
प्रश्न :छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?
उत्तर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर 1674 रोजी झाला.
छत्रपती शिवाजी महाराज शायरी,छत्रपती शिवाजी महाराज वंशावळ,छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकछत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र मराठी,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी तयार केली,छत्रपती शिवाजी महाराज जन्म तारीख,छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो,छत्रपती शिवाजी महाराज बॅनर,छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा.छत्रपती शिवाजी महाराज रिंगटोन,छत्रपती शिवाजी महाराज वंशज,छत्रपती शिवाजी महाराज आरती,छत्रपती शिवाजी महाराज पत्नीमाझा आवडता नेता छत्रपती शिवाजी महाराज निबंध’छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले,छत्रपती शिवाजी महाराज जयंती स्टेटस.छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा;छत्रपती शिवाजी महाराज की जय.छत्रपती शिवाजी महाराजांची आरती,छत्रपती शिवाजी महाराज वॉलपेपर,छत्रपती शिवाजी महाराज इमेज,छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे.या सर्व queries लवकर अपडेट केल्या जातील .