visionvibe24.com

नवीन संसद भवन 

नवीन संसद भवन

भारतीय संसदिय प्रणालीचा अविभाज्य भाग म्हणजे संसद भवन. या संसद भवनाच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा अलीककडेच पार पडला. तर मित्रांनो काय आहे या नवीन संसद भवनाची वैशिष्ट्ये, पाहुयात सविस्तरपणे.

भूमिपूजन-10 डिसेंबर 2020                                                      उद्घाटन-28 मे 2023 

 कामकाज सुरू दिवस-19 सप्टेंबर 2023                                      हस्ते-पंतप्रधान नरेंद्र मोदी  

वास्तूरचनाकार– वीमल पटेल                                                      निर्मिती– टाटा प्रोजेक्ट लिमिटेड

अंदाजीत खर्च– 970 कोटी        

 डिझाईन तयार– एचसीपी प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रा.लि सेंट्रल व्हिसट प्रकल्पांतर्गत बांधकाम.

केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग ही संसदेची नवीन इमारत बांधण्यासाठी ची नोडल एजन्सी 

 

नवीन संसद भवनाची वैशिष्ट्ये:

1) या संसद भवनामध्ये एक मोठे संविधान सभागृह आहे, त्यातून भारताच्या लोकशाही वारशाचे दर्शन होईल. 

    भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत येथे ठेवण्यात आली आहे. 

2) मुख्य चार मजली इमारत त्रिकोणी आकारांमध्ये असून बांधकाम 64 हजार 500 चौरस मीटर एवढे आहे. 

   16 हजार 921 चौ. मी अंडरग्राउंड असेल.

3) या इमारतीला मुख्य तीन प्रवेशद्वार आहेत. ज्ञानद्वार (अश्व) ,शक्ती द्वार (गज) आणि कर्म द्वार (गरुड) अशी नावे देण्यात आली आहेत तीन मुख्य प्रवेशद्वारातून उपराष्ट्रपती सभापती आणि पंतप्रधान प्रवेश करतील. सहा दरवाजांवर विविध प्राण्यांचे शिल्प असून ते प्राचीन शिल्पकलेपासून प्रेरित आहेत. खासदार व सामान्य जनतेसाठी मकर शार्दुल आणि हंसद्वाराचा वापर केला जाणार आहे.

 

नवीन संसद भवन एकूण सहा दरवाजांची माहिती पुढील प्रमाणे:

1) हंस द्वार – हम्पीतील विजय विठ्ठल मंदिरातील हंस शिल्पाची प्रतिकृती नव्या संसदेतील एका प्रवेशद्वारासमोर

2) शार्दुल द्वार- ग्वाल्हेर येथील गुजरी महालाच्या प्रवेशद्वारावर दोन व्याघ्रमुर्ती आहे त्यावरून प्रेरित होऊन शार्दुल द्वार येथे वाघाचे शिल्प तयार करण्यात आले आहेत.

3) गजद्वार- कर्नाटकातील बनवासी येथील मधुकेश्वर मंदिरातील शिल्पापासून प्रेरित होऊन हत्तीचे दोन दगडी शिल्प येथे आहेत. 

4) मकरद्वार- कर्नाटकातील होयसाळेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेले मगरीच्या मूर्ती पासून प्रेरित होऊन येथे शिल्प तयार केले आहे. 

5) गरुड द्वार- तमिळनाडूतील अठराव्या शतकातील नायक काळातील शिल्पकलेचा आधार घेऊन येते शिल्पकला साकारण्यात आली . 

6) अश्वद्वार- ओडीसातील कोणार्क येथील सूर्य मंदिरातील शिल्पापासून प्रेरित होऊन हे द्वार उभारले आहे.

लोकसभेत खासदारसाठी सुमारे ८८ आणि राज्यसभा खासदारासाठी सुमारे 384 पेक्षा जास्त सीट्स असणार आहेत पार्लमेंट हॉलमध्ये एकूण 1274 सदस्य एकाच वेळी बसू शकतील अशी क्षमता असेल भविष्यात दोन्ही सभागृहांची वाढीव संख्या लक्षात ठेवून असे करण्यात आले आहे.हे नवीन भवन आत्मनिर्भर भारताचे उदाहरण आहे.इमारत पूर्णपणे भूकंप प्रतिरोधक आहे. 

 

नवीन संसद भवन सेंट्रल व्हिसटा  पुनर्विकास प्रकल्प:

दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन संसद भवन नॉर्थ ब्लॉग साऊथ ब्लॉक इंडिया गेट व इतर अभिलेखागार कार्यालय ज्या क्षेत्रांमध्ये आहे त्या क्षेत्रात संयुक्तपणे सेंट्रल विस्टा असे म्हणतात. नवीन संसदेची इमारत बांधण्यासंबंधी प्रकल्प म्हणजे सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट होय नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट पर्यंतच्या 3.2 किमी लांबीच्या भागाला सेंट्रल विस्टा असे म्हणतात .

नवीन संसद भवन विशेष स्मारक तिकीट आणि 75 रुपयांची नाणे:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावनांच्या उद्घाटनानिमित्त एक विशेष स्मारक तिकीट आणि 75 रुपयांचे नाणेजारी केले नाण्याचे वजन 34.65 ग्राम ते 35.35 ग्रॉम दरम्यान असेल एका बाजूला मध्यभागी अशोक स्तंभाची प्रतिमा एका बाजूला देवनागरी लिपीतील भारत असे आणि दुसऱ्या बाजूला इंग्रजी मध्ये इंडिया आहे. या नाण्याचा व्यास 44 मिलिमीटर असून हे नाणे 4 धातूंनी बनलेले आहे यामध्ये 50%चांदी ,42%तांबे,5%निकेल आणि 5 % जस्त आहे .नाण्याच्या दुसऱ्या बाजूला संसदेचे चित्र आहे तर वरच्या बाजूला देव नागरिक व खालच्या बाजूला इंग्रजीतून संसद संकुल.असे लिहिलेले आहे याबरोबरच मानायच्या खालच्या बाजूला 2023 हे वर्ष छापले आहेत 75 रुपयाचे नाणे हे आज वरचे सर्वात मोठे आणि महागडे नाणे आहे.                                                                                                                            

                 घटक                 जुनी संसद                  नवीन संसद 
  पायाभरणी  12 फेब्रुवारी 1921  10  डिसेंबर 2020 
  निर्मितीचा काळ 1921 ते 1926 (6 वर्ष ) 2020- 2023 (3 वर्ष )
    खर्च  83 लाख  1200 कोटी रुपये 
  वास्तू रचना  एडविन लचीन्स हर्बर्ट बेकर  एच सी पी  डिझाईन्स ( विमल पटेल)
  उद्घाटन 18 जानेवारी 1927    १८ मे २०२३  
  उद्घाटक  लॉर्ड आयर्विन  पंतप्रधान नरेंद्र मोदी 
    आसन क्षमता  लोकसभा 545, राज्यसभा 250  लोकसभा-888,राज्यसभा-384 
  अंतिम कामकाज दिवस  18 सप्टेंबर 2023  नवीन संसद भवन कामकाज सुरू 19 सप्टेंबर 2023 

जुने संसद भवन आता संविधान सधन म्हणून ओळखले जाणार आहे.

 

नवीन संसद भवन ऐतिहासिक सेंगोल :

 

    नवीन संसद भवनात लोकसभा अध्यक्ष यांच्या असनाजवळ सेंगोल  या नावाने प्रचलित राजदंड ठेवण्यात आला आहे.१९४७ मध्ये दे सोडताना इंग्रजांनी हा सेंगोल भारताच्या ताब्यात देऊनच सत्तेचे हस्तांतरण केले होते .सेंगोल चा वापर सर्व बहुमत्वाचे प्रतीक म्हणून केला जातो सोने किंवा चांदीचा बनलेला हा राजदंड शक्ती आणि अधिकाराचे प्रतीक आहे. सेंगोल हा शब्द तमिळ शब्द सेम्मई वरून आला आहे या राजदंडात चांदीच्या सेंगोलवर सोन्याचा थर असतो त्यावर भगवान शंकराचे वाहन नंदी विराजमान आहे हा सेंगोल पाच फुटांचा आहे सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गधेच्या आकाराच्या राजदंडाला तमिळमध्ये सेंगोल म्हणतात सेंगोल म्हणजे भरपूर समृद्धी धनधान्य असणे.

       याचे वजन ८०० ग्रॅम सोन्याचा मुलामा.इंग्रजांकडून 14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री 11:45 वाजता हा राजदंड सत्ता हस्तांतरण म्हणून पंडित नेहरू यांना सोपवला होता 1978 पासून तो अलाहाबाद (प्रयागराज) संग्रहालयात ठेवण्यात आला होता . आठव्या शतकामध्ये चूल साम्राज्यात याचा वापर केला जात होता साम्राज्याचे राजा वारसदाराची घोषणा करून सत्ता हस्तांतरण म्हणून सेंगोल सोपवत असत . इंग्रजांनी व्हॉइस लॉर्ड माऊंटबॅटन सत्ता कशी सोपवायचे हे नेहरूंना विचारले होते सी. राजगोपालचारी यांनी सेंगोल विचार दिला. तो तमिळनाडूच्या सोनारांकडून बनवून घेतला निर्मितीत सहभागी वुम्मीदी सुधाकर(88) वुम्मीदी एथिराजुलु (96)अजून हयात आहेत .

 

   

Exit mobile version