visionvibe24.com

रानभाज्या भाग -2 “या आरोग्यदायी रानभाज्या अमृता समान”

रानभाज्या ranbhajya

 मित्रांनो मानवी जीवनामध्ये सकस संतुलित आहाराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.आपण जो दैनंदिन आहार घेतो त्यातून आपल्या शरीराला लोह कॅल्शियम प्रथिने विटामिन कार्बोदके असे आवश्यक घटक मिळतात. मित्रांनो अशाच प्रकारचा सकस आहार घेण्याचा आपण प्रयत्न करीत असतो.

पावसाळ्यात विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक रानभाज्या व फळभाज्या आपणास पाहावयास मिळतात याच रानभाज्यातून आपल्या शरीराला अमूल्य असे घटक भेटतात.पावसाळ्यात मिळणाऱ्या या रानभाज्या आपल्या आदिवासी व शेतकरी बांधवांनी शोधून काढल्या आणि अनेक पिढ्यापासून त्या जपल्या आहेत.या रानभाज्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रानभाजी महोत्सव भरवले जातात.तर मित्रांनो या लेखाच्या माध्यमातून आपण आपल्या आजूबाजूला मिळणारे रानभाज्यांची माहिती पाहणार आहोत.

 

रानभाज्यांची (ranbhajya) नावे :

 

1) दिंडा (Leea macrophylla) :

दिंडा ही भाजी पावसाळ्यात मिळते दिंडा ही भाजी खाण्यास खूप चविष्ट असते.बाजारात दिंड्याची देठे विकायला येतात. ती वरून थोडी लालसर असतात.या भाजीत कफ,वात ,पित्त,उष्ण गुणधर्म आहेत.या भाजीच्या सेवनाने पोटाचे विकार दूर होतात या भाजीच्या मुळापासून जखमा गजकरण बरे होतात या वनस्पतीत ग्राही वेदनास्थापन आणि रक्तस्कं दन हे औषधी गुणधर्म आहेत.

2) पाथरी पातुर (Launaea procumbens) :

पाथरी ही भाजी सर्वत्र आढळते. ही भाजी भारतातील सर्व प्रदेशात उगवते. ही भाजी जमीनलगत गोलाकार आकारात येते.पाने एकवट गुच्छा प्रमाणे असतात.पाने लांबट आकाराची असून त्यांची कडा नागमोडी असते.पाथरीची भाजी त्वचेचे विकार व रक्त शुद्धीसाठी फार उपयुक्त आहे. या भाजीच्या रससेवनाने खोकल्याचा आजार बरा होतो त्याचप्रमाणे मुतखड्याच्या आजारात या रसाच्या सेवनाने मुतखडा बरा होतो.पात्रीचा अंगरस जेष्ठमधाबरोबर दिल्यास बाळंतनीचे दूध वाढते या भाजीच्या सेवनाने पित्ताचा त्रास कमी होतो.

R

3)पानांचा ओवा (Plectranthus amboinicus):

ओव्यांच्या पानात औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणात आहेत.ओवा हा पाचक, दीपक, उष्ण गुणांचा असून विकार अपचन कफ दमा लहान मुलांचे पचनाचे विकारावर उपयुक्त आहे ओव्यांचा पानांचा औषधात वापर करतात पेयजलांना सुवासिक वास येण्यासाठी पानांचा उपयोग करतात पोटदुखी अपचन पोटशूळ असो यामध्ये एखादे पान दिल्यास गुण येतो.

4)सुरण-(Amorphophallus paeoniifolius):

सुरण ही एक फळभाजी आहे.सुरण कंदाचा भारतीय औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सुरणचाकंद विशेष करून मूळव्याध वर उपयुक्त असल्याचे मानले जाते.सुरणापासून चविष्ट असे पदार्थ बनवले जातात सुरणाचे काप सुरणाचे चिप्स सुरणाची भाजी सुरणाची भजी सुरण हा खाण्यात जसा चविष्ट आहे तसेच त्याचे औषधी गुणधर्मही आहेत सुरण कंदाच्या भाजीने यकृताची क्रिया सुधारते आतड्याच्या रोगात सुरणाची भाजी गुणकारी आहे सुरणाची भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच

जरूर वाचा –भाग 1 रानभाज्या 

Exit mobile version