visionvibe24.com

सायकल(cycle) म्हणजे काय? सायकल(cycle) वापरण्याचे फायदे कोणते आहेत?

आज मानवाने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने खूप प्रगती केली. अगदी अमर्यादा अशा अवकाशामध्ये विहार करण्यापासून, चंद्र व मंगळापर्यंत मजल मारण्यापर्यंत तसेच अथांग अशा समुद्रामध्ये खोल जाण्यापर्यंतचा प्रवास मानवाने सहज शक्य केला. वाहनाचे स्वरूप शतकान व शतके बदलत गेली. महत्व कमी जास्त होत गेले. मात्र सायकल(cycle) हे असे एक वाहन आहे,जे सातत्याने मागील 200 ते 250 वर्षांपासून माणसाकडून आवडीने वापरले जाते. सातत्याने भविष्यातही हे वाहन वापरले जाईल. सायकलच्या शोधामुळे प्रवास अत्यंत कमी खर्चामध्ये आणि सुकर बनला. सर्वप्रथम सायकल(cycle)युरोपमध्ये तयार झाल्यानंतर तेथूनच पूर्ण जगाला या वाहनाची माहिती झाली.

म्हणूनच मित्रांनो या लेखाच्या माध्यमातून आपण सायकल(cycle)विषयी विस्तृत माहिती पाहणार आहोत जी आपणास फायदेशीर ठरेल.

सायकल(cycle) ची रचना कशी असते?

सायकलची रचना अत्यंत साध्या व सोप्या तत्त्वावर आधारलेली आहे. एखादी परिपूर्ण सायकल एक हँडल,दोन टायर व्हिल्स, मजबूत लोखंडी फ्रेम, पेडल ची जोडी, ब्रेकिंग सिस्टीम व अन्य काही बाबी पासून बनलेली असते. विशेषता सायकल मध्ये अगदी कमी सामानाचा उपयोग होतो, सायकल(cycle)हे वाहन सर्वाला इंधनाशिवाय वापरता येणारे,परवडणारे व कमी खर्चिक आहे.

सायकल(cycle)चा शोध व इतिहास काय आहे?

सायकल(cycle)चा शोध म्हणजे उत्क्रांत वादाचे उत्तम उदाहरण आहे. सायकलच्या रचनेमध्ये कालपरत्वे बदल होत गेला. व आजची परिपूर्ण सायकल(cycle) तयार झाली. तशी आजही या सायकलच्या स्वरूपामध्ये रचनेमध्ये सातत्याने बदल होत आहे.

Carl Driss याने सर्वप्रथम सायकल(cycle) तयार केली. म्हणूनच Carl Driss याला सायकलचा निर्माता असेही म्हणतात. परंतु त्यांनी निर्माण केलेली सायकल परिपूर्ण नव्हती. सायकल ला पायाने पुढे ढकलावी लागत असे.

साधारणपणे 1820 ते 1850 च्या दरम्यान Willard Sawyer यांनी एक परिपूर्ण सायकल तयार केली. ज्याची रचना तीन चाके व चार चाके अशा स्वरूपाची होती. मात्र ती सायकल(cycle) वजनाला खूप जड होती. तरीही या सायकलला जगामधून खूप पसंती मिळाली. जागतिक बाजारामध्ये या सायकलला खूप मागणी देखील प्राप्त झाली.

परंतु मित्रांनो दुचाकी सायकल तयार करण्याचे श्रेय Mac Millan जाते. त्यानंतर या सायकलमध्ये 1884 मध्ये बदल करण्यात आला व पहिली चैन असलेली सायकल तयार झाली. त्यामध्येही कालांतराने बदल होत गेले व आजची उत्क्रांत झालेली सायकल(cycle) सर्वांना मिळाली.

सायकल(cycle)चे प्रकार कोणते आहेत?

साधारणपणे मित्रांनो सायकलचे विविध प्रकार पाहायला मिळतात, परंतु ज्या सायकलने कमी कालावधीत आपल्या कामाच्या स्वरूपामुळे लोकप्रियता मिळवली अशा सायकल(cycle) चे काही प्रकार खालील प्रमाणे आहेत.

1)रोड सायकल :

2)जीपीएस सायकल

3 माउंटेन सायकल

4)फोल्डिंग सायकल

5)टुरिंग सायकल

6)गिअर सायकल

7)स्टंट सायकल

8.इलेक्ट्रिक सायकल

1. रोड सायकल(cycle)

रोड सायकलचा वापर जास्तीत जास्त रोड सायकल (cycle) रेसिंग साठी केला जातो. रोड सायकलची रचना लांबट स्वरूपाची असते. त्याचबरोबर रोड सायकल वजनाला अत्यंत हलकी असते. या सायकलचे टायर्स अत्यंत अरुंद असतात, त्यामुळे सायकल ला अधिक गती प्राप्त होऊ शकते. सायकल प्रेमीच्या पसंतीस उतरलेला सायकल हा प्रकार अधिक लोकप्रिय आहे.

2. जीपीएस सायकल(cycle)

साधारणपणे जीपीएस सायकल(cycle) देखील सामान्य सायकलीप्रमाणेच असते. या सायकलच्या प्रकारामध्ये जीपीएस आणि अन्य तंत्रज्ञान दिलेले असते. या सायकली लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रदक्षिणा यात्रांसाठी वापरल्या जातात. परिचित नसलेल्या ठिकाणावरून प्रवास करण्यासाठी जीपीएस सायकलचा वापर केला जातो.

3.माउंटेन सायकल(cycle)

साधारणपणे माउंटन सायकल(cycle)ची रचना सामान्य सायकली प्रमाणेच असते.अत्यंत खडबडीत आणि वळणदार रस्ता, घाट, डोंगर अशा ठिकाणी प्रवास करण्यासाठी माउंटेन सायकलचा वापर केला जातो. या सायकलची विशेषता म्हणजे चाके इतर सायकल पेक्षा मोठी आणि जाड असतात. भ्रमंती करण्याची आवड असणारे व ट्रेकिंग करणाऱ्या लोकांमध्ये ही माउंटेन सायकल(cycle)विशेष प्रसिद्ध आहे.

4.फोल्डिंग सायकल(cycle)

फोल्डिंग सायकल(cycle) देखील दिसायला सामान्य सायकली सारखेच असते. परंतु या सायकलचे विशेषता म्हणजे घडी घालून एखाद्या बॅगमध्ये आपण या सायकलला ठेवू शकतो. आवश्यकता असेल त्या ठिकाणी घडी उलगडून सायकल तयार करू शकतो.

एम्मित लत्ता(Emmit latta) या अमेरिकन नागरिकांनी जगामध्ये सर्वप्रथम 1887 मध्ये फोल्डिंग सायकल तयार केली. आज इतर सायकली प्रमाणेच फोल्डिंग सायकल देखील बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विकली जाते.

5.टुरिंग सायकल(cycle)

टुरिंग सायकल(cycle)दिसायला सामान्य सायकली प्रमाणेच असते. मात्र या सायकलची रचना लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाईन केलेली असते. टुरिंग सायकल बनवण्यासाठी उच्च प्रतीच्या सामग्रीचा वापर केला जातो. त्यामुळे टुरिंग सायकल अधिक मजबूत आणि टिकाऊ बनते.

6.गिअर सायकल(cycle)

सायकलच्या धावण्याची क्षमता वाढावी यासाठी वेगवान सायकली तयार करण्यात आल्या,तसेच वेगावर नियंत्रण आणण्यासाठी गिअरच्या सायकल(cycle)ची रचना करण्यात आली. साधारणपणे हीच संकल्पना लक्षात घेऊन 1905 साली व्हेलाशिओ नावाच्या सायकल प्रवाशाने वाढदिवसाच्या सायकलचा शोध लावला. त्यांनी सायकल ला दोन गियर बसवून पहिली गिअरची सायकल(cycle) तयार केली. मित्रांनो आज आपण पाहतो की या गियरची संख्या 6/7 पर्यंत पोहोचली आहे. सायकलच्या धावण्याची क्षमता वाढावी तसेच गतिमान सायकलीवर तात्काळ नियंत्रण प्राप्त व्हावे, यासाठी गिअरची सायकल अधिक लोकप्रिय होऊ लागली आहे.

7.स्टंट सायकल(cycle)

साधारणपणे स्टंट सायकल(cycle)ची रचना सामान्य सायकलीपेक्षा थोडी वेगळी असते. या सायकलीचा वापर मनोरंजनासाठी स्टंट तसेच व्यावसायिक उपयोगी चे स्टंट करण्यासाठी केला जातो. एका चाकावर सायकल चालवणे, सायकल गोल गोल फिरवणे, पायाच्या साह्याने सायकल चालवणे, सायकलच्या सीटवर उभा राहून सायकल चालवणे इत्यादी स्टंट या स्टंट सायकलच्या माध्यमातून केले जातात.सर्कस, सिनेमांचे चित्रीकरण आदी ठिकाणी स्टंट सायकलचा वापर केला जातो. या सायकली सामान्य सायकलीपेक्षा अधिक हलक्या असतात.

8.इलेक्ट्रिक सायकलcycle

आज मानवाने तंत्रज्ञानामध्ये किती प्रगती केली, याचे उत्तम उदाहरण म्हणजे इलेक्ट्रिक सायकल(cycle).मित्रांनो 1897 मध्ये होस्सी लिब्बेय (Hossi libbey) या अमेरिकन नागरिकांने जगातील पहिल्या विजेवर चालणाऱ्या सायकलचा शोध लावला.सामान्यतः सायकल ही पर्यावरण पूरक असतेच मात्र या पर्यावरण स्नेही सायकलमध्ये चार चांद लावले ते इलेक्ट्रिक सायकलने. कारण इलेक्ट्रिक सायकलच्या माध्यमातून प्रदूषणास तर आळा बसणारच होता पण त्याबरोबर माणसाचे श्रम देखील वाचणार होते.त्यामुळे इलेक्ट्रिक सायकल अल्प कालावधीत अधिक लोकांच्या पसंतीस उतरली. आज या सायकलचा सर्रास वापर केला जातो.

सायकल(cycle) वापरण्याचे फायदे कोणते आहेत?

सायकल वापरल्याने काही वैयक्तिक स्वरूपातील व काही सामुदायिक स्वरूपातील फायदे आहेत. सायकल वापरण्याचे फायदे खालील प्रमाणे

सायकल(cycle) वापरण्याचे व्यक्तिगत फायदे :

1.शारीरिक आरोग्य संवर्धन व व्यायाम:

नियमितपणे सायकल चालवल्याने शरीरास व्यायाम मिळतो.शरीराची चांगल्या प्रकारे हालचाल होते. शरीरातील रक्तप्रवाह वाढतो.अवयवांची व पेशींची कार्यक्षमता वाढते.स्नायू बळकट होतात.

2. हृदय व फुफ्फुसाची क्षमता वाढते :

सायकल(cycle)चालवल्यामुळे शरीरातील रक्त पुरवठा सुरळीत होतो. रक्तपुरवठाची क्षमता वाढते. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंची हालचाल वाढते व हृदय निरोगी व कार्यक्षम बनते. त्याचबरोबर फुफ्फुसाची क्षमता देखील वाढते. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग,टाईप 2 मधुमेह आणि विशिष्ट प्रकारचे कर्करोग अशा आजाराचा धोका नियमित सायकल चालवल्यामुळे कमी होतो.

3.माणसाचे वजन नियंत्रणात राहते :

सायकल चालवणे हा उत्तम प्रकारचा व्यायाम आहे. साधारणपणे नियमितपणे सायकल(cycle) चालवल्याने तीनशे ते चारशे कॅलरी बर्न होतात. पर्यायाने माणसाचे वजन नियंत्रणात राहते. डॉक्टर किंवा फिजिओ वजन नियंत्रण करण्यासाठी किंवा वाढलेले वजन कमी करण्यासाठी सायकलिंगचा वापर करण्याचा सल्ला देतात.

4.कमी दुखापतीचा व्यायाम प्रकार

सायकलिंग(cycling) हा इतर व्यायाम प्रकार पेक्षा कमी दुखापतीचा व कमी इजा पोहोचवणारा व्यायाम प्रकार आहे. धावण्यासारख्या व्यायाम प्रकारामुळे स्नायूंना दुखापत होण्याची क्षमता असते. वेगवेगळ्या वयोगटातील लोकांसाठी सायकल चालवणे हा सोपस्कार व्यायाम प्रकार ठरू शकतो.

5.उत्तम झोप-उत्तम आरोग्य

सायकल(cycle)चालवल्यामुळे शरीरास उत्तम प्रकारचा व्यायाम प्राप्त होतो. त्यामुळे झोपेच्या गुणात्मक पद्धतीमध्ये सुधारणा होते. उत्तम झोप ही शरीरातील ऊर्जा पातळी वाढवते. पर्याय आणि माणसाचे आरोग्य उत्तम राहते.

6.मेंटल हेल्थ सुधारते:

चिंता,नैराश्य किंवा तणाव यासारखे मानसिक आजार कमी करण्यासाठी सायकल(cycle)चालवण्याचा फायदा होतो.कारण सायकल चालवल्यामुळे शरीरास व्यायाम मिळतो. पर्यायाने इंडोमार्फिंगचे शरीरामध्ये सिक्रेशन वाढते. इंडोमार्फिन हार्मोन समाधान आणि आनंद मिळवून देण्यासाठी हातभार लावते.

सायकल(cycle) चालवण्याचे सामूहिक फायदे

1.पर्यावरण पूरक सायकल(cycle):

आजच्या घडीला पारंपरिक वाहनांच्या माध्यमातून हरितगृह वायूचे उत्सर्जन वाढले आहे. वातावरणामध्ये कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण जास्त झाले आहे. पर्यायाने वायु प्रदूषण आणि हवामान बदलाचा सामना माणसाला करावा लागत आहे. परंतु सायकल(cycle) हे पर्यावरण स्नेही वाहतुकीचे साधन आहे. जे 0 प्रमाणात हरितगृह वायूचे किंवा कार्बनचे उत्सर्जन करते.

2. सायकल(cycle)वापरामुळे समाजातील परस्पर संवाद वाढतो :

आज मी तिला सायकल चालवणे हा एक सामाजिक इव्हेंट बनला आहे. एकत्रितपणे सायकल चालवणे म्हणजेच समूहराईड करणे. सायकल क्लब मध्ये शामील होणे, यामुळे व्यक्ती व्यक्तीमध्ये मैत्रि निर्माण होणे तसेच एकमेकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण होते.

3.राष्ट्राच्या आर्थिक उन्नतीत हातभार लावणे :

आयात केल्या इंधनाचा वापर केल्यामुळे देशातील वित्त बाहेर जाते. छोट्या मोठ्या कामासाठी सायकलचा वापर केल्यामुळे इंधनाची बचत होते. पर्यायाने पैशाची बचत होते, त्यामुळे वेल्थ ड्रेनेज काही प्रमाणात सायकल वापरल्यामुळे थांबवू शकतो.

अशा विविध अंगी फायदेशीर असणाऱ्या सायकलचा वापर करणे फायदेशीर आहे.

तुम्ही हे ही वाचू शकता :

स्टायलिश लुक व महत्त्वाच्या फिचर मुळे 2024 मध्ये ही स्वस्त कार भाव खाणार.

 

 

FAQ

1.प्रश्न : दुचाकी सायकलचा शोध कोणी लावला?

उत्तर:दुचाकी सायकलचा शोध मॅकमिलन यांनी लावला.

2.प्रश्न:सायकलचा शोध केव्हा लागला?

उत्तर:परिपूर्ण सायकलचा शोध 1820 ते 1850 च्या दरम्यान लागला.

3.प्रश्न:इलेक्ट्रिकल सायकलचा शोध केंव्हा व कोणी लागला?

उत्तर: इलेक्ट्रिकल सायकलचा शोध 1897 मध्ये होस्सी लिब्बेय यांनी लावला.

4.प्रश्न:सायकल चालवण्याचे फायदे काय?

उत्तर:सायकल चालवल्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते.

 

 

 

 

Exit mobile version