द्राक्ष शेतकऱ्याच्या हिताचा मंत्रिमंडळ निर्णय. वाईन उद्योगास चालना.

द्राक्ष शेतकऱ्याच्या हिताचा मंत्रिमंडळ निर्णय. वाईन उद्योगास चालना.

राज्यातील द्राक्ष शेतकऱ्यांसाठी दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी राज्य शासन मंत्रिमंडळाने महत्त्वपूर्ण  निर्णय घेतलेला आहे. या मंत्रिमंडळ निर्णयामुळे राज्यातील द्राक्ष शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. राज्यातील द्राक्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना पाच वर्षासाठी राबवली जाणार आहे. यामुळे राज्यातील द्राक्ष शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

 

मित्रांनो राज्यातील द्राक्ष शेतकऱ्याच्या हितासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना पाच वर्षांसाठी राबवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते.

कोरोनाच्या काळात 2020-21 मध्ये ही योजना बंद करण्यात आली होती.या योजनेत 2020- 21,2021- 22 व 2022 23 या वर्षात उद्योजकांनी व्हॅटचा भरणा केला आहे. 2023 24 हे आर्थिक वर्ष संपल्यास कमी कालावधी शिल्लक असून योजना बंद होण्यापूर्वी निश्चित केलेल्या 16 टक्के प्रमाणे व्हॅट परतावा देखील देण्यात येईल.राज्यातील द्राक्ष शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहन देणे, सुकामेवा बनविणे तसेच पर्यायी उत्पादनाची निर्मिती करण्यासाठी या वाईन उद्योगास प्रोत्साहन देणारी योजना सुरू करण्यात आली आहे.ही योजना राज्यात वाईन उद्योग विकसित करण्यासाठी देखील उपयुक्त ठरणार असल्यामुळे या योजनेस पाच वर्षासाठी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मित्रांनो राज्य शासनाच्या या मंत्रिमंडळ निर्णयामुळे राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या मालाला योग्य तो भाव मिळण्यास मदत होणार आहे. सदरील मंत्रिमंडळ निर्णय हा उद्योग विभागासाठी निर्गमित करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे राज्यातील द्राक्ष शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. आज बरोबर द्राक्ष आधारित पर्यायी उद्योगाना चालना मिळणार आहे. राज्यामध्ये द्राक्ष लागवडीचे संबंधित असलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

मित्रांनो त्याच बरोबर या शासन निर्णयामुळे वाईन उद्योगाला देखील प्रोत्साहन मिळणार आहे. राज्य शासनाकडून सदरची योजना पाच वर्षासाठी राबवली जाणार आहे. या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय तुम्ही खाली पाहू शकता.

 

2 thoughts on “द्राक्ष शेतकऱ्याच्या हिताचा मंत्रिमंडळ निर्णय. वाईन उद्योगास चालना.”

Leave a comment