visionvibe24.com

अधिकारी व्हायचे!! तर करा आजपासून अर्ज.(Mpsc preliminary exam 2024)

अधिकारी व्हायचे!! तर करा आजपासून अर्ज.(Mpsc preliminary exam 2024)

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत एकूण 274 पदांच्या भरती करिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024, साठी 5 जानेवारी 2024 पासून आवेदन भरण्यास सुरुवात.

पदांची संख्या

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राज्य राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024,ची जाहिरात 29 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. सदरची पूर्व परीक्षा राज्यातील एकूण 37 जिल्हा केंद्रावर 28 एप्रिल 2024 रोजी होणार आहे.

या परीक्षेच्या माध्यमातून सामान्य प्रशासन विभागासाठी – 205, मृद व जलसंधारण विभागासाठी – 26 पदे आणि महसूल व वन विभागासाठी 26 पदे भरली जाणार आहेत.

 

 अर्ज सादर करण्याची प्रक्रिया 

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024(Mpsc preliminary exam 2024)

साठी अर्ज सादर करण्याचा कालावधी 5 जानेवारी 2024 ते 25 जानेवारी 2024 पर्यंत आहे. ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरण्याची अंतिम दिनांक 25 जानेवारी 2024 तर शुल्क भरण्याची अंतिम मुदत 28 जानेवारी 2024 आहे. तर चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम मुदत 29 जानेवारी आहे.

 

 

 पूर्व परीक्षा  नंतर मुख्य परीक्षेचे वेळापत्रक(Mpsc preliminary exam 2024)

संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालानंतर संबंधित संवर्गाच्या स्वतंत्रपणे मुख्य परीक्षा आयोजित करण्यात येतील. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024, दिनांक 14 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2024 रोजी होईल. महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी होईल. महाराष्ट्र राज्य वन सेवा मुख्य परीक्षा 2024, दिनांक 28 ते 31 डिसेंबर 2024 रोजी होईल.

 

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024(Mpsc preliminary exam 2024)

परीक्षेसाठी आवश्यक असणारी पात्रता, पदसंख्या तसेच आरक्षणासंदर्भातील सर्वसाधारण सूचना, शैक्षणिक पात्रता तसेच इतर सर्व बाबीं करता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन सविस्तर पाहू शकता.

 

 

Exit mobile version