visionvibe24.com

अंगणवाडी मदतनीस ची कामे कोणती आहेत ?

अंगणवाडी मदतनीस ची कामे

अंगणवाडी मदतनीस ची कामे कोणती आहेत ?

मित्रांनो अंगणवाडी मदतनीस यांची कामे पाहण्यापूर्वी अंगणवाडी मदतनीस म्हणजे कोण? हे समजावून घेऊयात. महाराष्ट्र राज्यामध्ये एक लाख आठ हजार अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत.अंगणवाडी केंद्रामध्ये एक मुख्य अंगणवाडी सेविका कार्यरत असते. मुख्य अंगणवाडी सेविकेस दैनंदिन कामामध्ये मदत करण्यासाठी अंगणवाडी मदतनीस या पदाची निर्मिती करण्यात आली. अंगणवाडी मदतनीसास अंगणवाडी हेल्पर असेही म्हणतात. सध्याच्या घडीला या अंगणवाडी मदतनिसांना रुपये 4500 ते रुपये 5500 पर्यंत मानधन दिले जाते. महाराष्ट्र राज्यातील या अंगणवाडी मदतनीस तुटपुंजा मानधनांमध्ये देखील अत्यंत प्रामाणिकपणे आपले कार्य पार पाडत असतात. राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये अंगणवाडी सेविका बरोबरच अंगणवाडी मदतनिसांची भूमिका महत्त्वाची आहे.

 अंगणवाडी मदतनीस ची कामे: विशेष कामे 

1) अंगणवाडी व सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे. विद्यार्थ्यांना अंगणवाडी परिसर प्रसन्न वाटेल. असे स्वच्छता ठेवावी.

2) दैनंदिन उपयोगासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे. पोषण आहार व इत्यादी कामासाठी आवश्यक असलेले पाणी अंगणवाडी केंद्र मध्ये उपलब्ध करून देणे.

3) लाभार्थ्यांसाठी पूरक आहार स्वच्छतापूर्वक शिजवणे व वाटप करणे.

4) मुलांच्या स्वच्छतेची दक्षता घेणे व मुलांना स्वच्छ राहण्यासाठी मदत करणे.

5) अंगणवाडी कार्यकर्ती च्या मार्गदर्शनाखाली पूर्व शालेय शिक्षणाचे साहित्य तयार करणे.

6) लहान मुलांना घरी जाऊन आणणे व पुन्हा पोहोच करणे.

7) वेगवेगळ्या बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी लाभार्थी, माता-पालक अन्य संबंधित व्यक्ती संपर्क साधने.

8) अंगणवाडी कार्यकर्ती च्या देखरेखी खाली अंगणवाडी केंद्र उघडणे व बंद करणे.

9) अंगणवाडी कार्यकर्ती रजेवर असताना किंवा आजारी असेल तेव्हा तिच्या सर्व कामाची जबाबदारी सांभाळणे.

10) पोषण आहारासाठी प्राप्त वस्तुंचा साठा करणे . पोषण आहारासाठी प्राप्त झालेला धान्य व धान्यादी मालांची साठवणूक कडे व वापराकडे लक्ष देणे व स्वच्छता ठेवणे.

11) अंगणवाडी भरण्याच्या विहित वेळेपूर्वी अंगणवाडी मदतनिसाने अंगणवाडी मध्ये हजर व्हावे.

12) अंगणवाडी मध्ये देण्यात येणाऱ्या पूर्व शालेय अभ्यासक्रमासाठी आपल्या जाणाऱ्या ऍक्टिव्हिटी साठी अंगणवाडी सेविकेच्या मदतीने अंगणवाडी मदतनीस यांनी साहित्याची रचना करावी. अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी अंगणवाडी  सेविकेस सहाय्य करावे.

अंगणवाडी मदतनीस ची कामे:

सर्वसामान्य कामे

अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेविकेबरोबरच अंगणवाडी मदतनीस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महिला व बाल विकास विभागाने सोपवलेली तसेच राज्य व केंद्र शासनाने वेळोवेळी दिलेली कामे पार पाडण्यासाठी अंगणवाडी सेविके बरोबर अंगणवाडी मदतनीस महत्त्वाची भूमिका बजावतात. चला तर पाहुयात अंगणवाडी मदतनीसांची कामे 

 1) अंगणवाडी केंद्रातील सर्व कार्याचे आयोजनामध्ये अंगणवाडी कार्यकर्तीस मदत करणे.

2) लाभार्थी मुलांच्या माता व इतर पालक यांना सल्ला देणे.

3) पूर्व शालेय शिक्षणासंदर्भातील कामकाज पार पाडणे.

4) आरोग्य तपासणी, मुलांची वजने घेणे, गर्भवती महिला बालकांना लस टोचणे. अंगणवाडी केंद्रातील मुली तसेच गर्भवती महिला यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अंगणवाडी सेविकेस राबविल्या जाणाऱ्या योजने मध्ये अंगणवाडी मदतनिसांनी मदत करावी. 

5) माता /समाज यांच्या बैठका घेणे. अंगणवाडी केंद्रामध्ये येणाऱ्या माता विद्यार्थ्यांशी संबंधित पालक यांना वेगवेगळ्या योजनेची माहिती देण्यासाठी अंगणवाडी सेविकेस मदत करणे.

6) अंगणवाडीतील मुलांमध्ये शिस्त लावणे. अंगणवाडी मधील मुलांमध्ये शिस्त येण्यासाठी शिस्त पूरक ऍक्टिव्हिटी करण्यामध्ये अंगणवाडी सेविकेस मदत करणे.

7) अंगणवाडी मधील लाभार्थी मुलांमध्ये  बालपणापासून संस्कार रुजवणूक करण्यासाठी प्रयत्न करणे.

8) शासनाकडून येणाऱ्या वेगवेगळ्या सर्वेसाठी अंगणवाडी कार्यकर्तीस सहाय्य करणे.

9) अंगणवाडी संबंधित लाभार्थ्यांच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये समन्वयकाची भूमिका बजावणे दिलेले कार्य विहित कालावधीत पूर्ण करणे.

10) अंगणवाडी मध्ये ठेवली जाणाऱ्या वेगवेगळ्या अभिलेखे व रजिस्टर यांची व्यवस्थित रित्या मांडणी करणे.अंगणवाडी सेविकेस ही अभिलेखे अद्यावत ठेवण्यासाठी वेळोवेळी मदत करणे.

11) वेगवेगळ्या नोंदी करण्यासाठी अंगणवाडी सेविकेस मदतनीस यांनी मदत करावी.

 

अंगणवाडी मदतनीस साठी पात्रता काय आहे?

 1) अंगणवाडी मध्ये अंगणवाडी मदतनीस होण्यासाठी किमान 12वी पास असणे आवश्यक आहे.अशी शैक्षणिक पात्रता असणारी महिला अंगणवाडी मध्ये मदतनीस होण्यासाठी अर्ज करू शकते.

2) अंगणवाडी मदतनीस होण्यासाठी वयोमर्यादा 12 ते 35 यामध्ये असणे आवश्यक आहे.

3)अंगणवाडी मदतनीस होण्यासाठीच्या उमेदवारास विवाहित असल्यास दोन पेक्षा अधिक अपत्य असू नये. दोन पेक्षा जास्त अपत्य असणारे उमेदवार अंगणवाडी मदत होण्यास पात्र असणार नाही.

4) अंगणवाडी मदतनीस होणाऱ्या उमेदवारासाठी ग्रामीण भागासाठी मराठी भाषा येणे अनिवार्य आहे. तर शहरी भागासाठी मराठी बरोबरच हिंदी भाषा ही येणे आवश्यक आहे.

 

ग्रामीण भागामध्ये महिला व बाल विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी केंद्रामधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस किमान वेतन कायद्यानुसार मानधन मिळावे यासाठी अंगणवाडी कर्मचारी सतत प्रयत्नशील आहे. निश्चितच या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा. किमान वेतन 26 हजार मिळावे किंवा न्यायालयाने दिलेला निकाल शासनाने मान्य करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनिय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा. पेन्शन व ग्रॅज्युटी यासारखे लाभ लागू करावेत कारण अंगणवाडी केंद्रातील कार्यरत या कर्मचाऱ्यांना ग्राम विकासात अनन्य साधारण महत्त्व आहे.

तुम्ही वाचू शकता :

अंगणवाडी आंदोलनातून काय मिळवले? आणि काय गमावले?

 

Exit mobile version