अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आपल्या विविध मागण्यासाठी 4 डिसेंबर 2023 पासून ते 25 जानेवारी 2024 पर्यंत एकूण 53 दिवस आंदोलन चालले. या आंदोलनाला महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून भरभरून प्रतिसाद मिळाला, याचे कारण असे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या असलेल्या रास्त मागण्या. या मागण्यांना न्याय मिळावा म्हणून या अंगणवाडी कर्मचारी आपल्या आर्थिक स्थितीचा विचार न करता ही या आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. परंतु मित्रांनो या ठिकाणी आपण या आंदोलनाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांनी काय मिळवले आणि काय गमावले त्याचबरोबर कोणते प्रश्न भविष्यात निर्माण झाले या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत.
अंगणवाडी आंदोलनाच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाकडून काय आश्वासन मिळाले?
दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी अंगणवाडी कर्मचारी कृती समिती च्या नेत्यांची तसेच महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार तसेच महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या. त्या मागण्या खालील प्रमाणे.
1) पेन्शन देण्याचे मान्य :
अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन प्रस्ताव तयार करून अंगणवाडी लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या साठी पाठवण्यात येईल.
2) नवीन मोबाईल देण्याचे मान्य :
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना MDM, POSHAN TRACKER आदी एप्लीकेशन असलेले अद्यावत अँड्रॉइड स्मार्टफोन देण्याचे आश्वासन देण्यात आले.
3) मिनी अंगणवाडी सेवकीचे श्रेणीवर्धन तात्काळ केले जाणार :
राज्यामध्ये कार्यरत असलेल्या 13011 मिनी अंगणवाडी सेविकेच श्रेणी वर्धन करून त्यांना अंगणवाडी सेविकेचे मानधन व दर्जा दिला जाणार.
4) संप काळातील कारवाई केलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दोष मुक्त केले जाणार :
संप काळामध्ये ज्या ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्याना कामावरून कमी केले होते, कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे आश्वासन देण्यात आले.तसेच सर्व कारवाई करण्यासाठीचे आदेश मागे घेण्याचे मान्य करण्यात आले.
5) संप काळातील कालावधी समायोजित केला जाणार : अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप काळामध्ये खर्ची केलेले 53 दिवस, कोरोना कालावधीमध्ये केलेल्या कामाच्या बदल्यासाठी समायोजित केले जाणार. त्यामुळे कोणत्याही अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे संप काळातील मानधन कपात केले जाणार नाही. असे आश्वासित करण्यात आले.
6) ग्रॅज्युटी देण्याचे मान्य :
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 24 एप्रिल 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन, ग्रॅज्युटी देण्याचे आश्वासन देण्यात आले.
तुम्ही अवश्य वाचा :अंगणवाडी सेविकांसाठी मोठा शासन निर्णय! अंगणवाडी सेविकांचे श्रेणीवर्धन, सुपरवायझर भरती, त्याचबरोबर भौतीक सुधारणात वाढ!!!
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष मागण्या कोणत्या होत्या?
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये काही प्रमुख मागण्या होत्या.अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आपल्या या मागण्या मान्य होणे अपेक्षित होते. प्रमुख मागण्या खालील प्रमाणे.
1) वेतनीय कर्मचाऱ्यांचा दर्जा व वेतनश्रेणी :
अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संप काळातील सर्वात प्रमुख मागणी म्हणजे न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन, इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी द्यावी.
2) किमान वेतन कायद्यानुसार मानधन वाढ देणे :
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी देणे शासनाला तात्काळ शक्य नसेल तर किमान वेतन कायद्यानुसार 26000 एवढी मानधन वाढ देणे.
3) पेन्शन व ग्रॅज्युटी चा लाभ देणे :
राज्यातील इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देखील पेन्शन व ग्रॅज्युटीचा लाभ मिळावा,अशी प्रमुख मागणी होती.
4)अंगणवाडी सुपरवायझर व मुख्यसेविकेचे प्रमोशन अंगणवाडी कर्मचारी मधूनच :
राज्यातील इतर शासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची काही पदे खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवली जातात. त्याच धर्तीवर अंगणवाडी साठी आवश्यक अंगणवाडी सुपरवायझर व मुख्य सेविकेचे प्रमोशन अंगणवाडी कर्मचाऱ्यांमधून दिले जावेत. ही देखील मुख्य मागणी होती.
5) अंगणवाडी मध्ये आवश्यक भौतिक सुविधांची उपलब्धता करून देणे.अशा या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या होत्या.
अंगणवाडी आंदोलनानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांंसमोर निर्माण झालेली प्रमुख प्रश्न :
1)अंगणवाडी कृती समिती / युनियन वरील विश्वासार्हता : अंगणवाडी कर्मचारी संघटना कृती समिती ने कोणत्याही अंगणवाडी कर्मचाऱ्यांशी कोणत्याही प्रकारचे सल्लामसलत न करता, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रपंचाचा विचार न करता,यशस्वीतेच्या नजीक पोहचलेले आंदोलन, कोणतेही ठोस आश्वासन किंवा मागणी मान्य न करून घेता, आंदोलन थांबविण्यात आले. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्याकडून अंगणवाडी कृती समिती किंवा युनियन वरील विश्वास सारेतेबद्दल प्रश्नचिन्ह करण्यात आला.
2)पेन्शन व ग्रॅज्युटी याबाबत स्पष्टता नाही :
राज्यातील अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना बंद करण्यात आलेली असून, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आश्वासित केलेली पेन्शन वगैरे योजना कोणतीही स्पष्टता सांगण्यात आलेली नाही. पेन्शन व ग्रॅज्युटी याबाबतचा आराखडा कसा व काय असेल स्पष्टता नाही.
3)संप काळातील मानधनाचे काय?:
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केलेल्या संप काळातील 53 दिवसाच्या कालावधीतील मानधन कपात केली जाणार,त्यामुळे आर्थिक प्रश्नाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताचीच असणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांसमोर 53 दिवसाच्या कपातीचा प्रश्न उभा टाकणार आहे.
4)नव्याने रुजू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलनात सहभाग असल्याकारणाने त्यांचेवर काय कारवाई होणार याबाबत प्रश्न अंगणवाडी कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या 53 दिवसाच्या आंदोलनातून काय मिळवले आणि काय गमावले याचा हिशोब येणारा काळच ठरवेल.