राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी राज्य शासनाने एक महत्वाचा शासन निर्णय महिला व बालविकास विभागासाठी निर्गमित केला आहे. या शासन निर्णयामुळे राज्यातील लाखो अंगणवाडी सेविकांना फायदा होणार आहे. तर काय आहे यासंदर्भातील 10 जानेवारी 2024 चा महाराष्ट्र राज्य शासनाचा शासन निर्णय. पाहूयात सविस्तरपणे…अंगणवाडी
मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाने दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी महिला व बाल विकास विभागासाठी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व 13011 मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रामध्ये श्रेणी वर्धन केले जाणार आहे.
आपणास ठाऊकच असेल राज्यामध्ये 97,475 अंगणवाडी केंद्र आणि 13011 मिनी अंगणवाडी केंद्र अशी एकूण एक लाख दहा हजार 486 अंगणवाडी केंद्र मंजूर आहेत.
केंद्र शासनाची सूचना राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या 13011 मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रामध्ये श्रेणीवर्धन करण्याची सूचना केंद्र शासनाने 10 मे 2023 रोजी एका पत्रांमुळे राज्य शासनाला दिलेली होती. तसेच या मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. याच पत्राचा अनुसरून महाराष्ट्र राज्य शासनाने दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी मिनी अंगणवाडी चे अंगणवाडी केंद्रामध्ये श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे.
शासन निर्णय: राज्यातील सर्व 13011 मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रात श्रेणीवर्धन करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या अतिरिक्त खर्चास शासन मान्यता देत आहे. मिनी अंगणवाडी केंद्राची अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतर झाल्यानंतर खालील बाबींमध्ये फायदा होईल.
मानधन वाढ : मिनी अंगणवाडी सेविकेचे श्रेणी वर्धन होऊन नेहमी तंगल्येचे स्वीकार हा दर्जा प्राप्त होणार पर्यायने अंगणवाडी सेविका साठी दे असणारे मानधन मिनी अंगणवाडी सेविकांना प्राप्त होणार. व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या खर्चास मान्यता राज्य शासनाने या शासन निर्णय दिली आहे.
मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका यांची पद निर्माण होणार : मित्रांनो या शासन निर्णयाचा दुसरा महत्त्वाचा फायदा असा की राज्यामध्ये जवळजवळ 520 पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविकेचे पद निर्माण होणार प्रमुख परीक्षका किंवा मुख्य सेविका पद भरती द्वारे भरले जाणार. व यासाठी आवश्यक असणाऱ्या खर्चास प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन केंद्र सावर राज्यसभा देण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली.
तुम्ही वाचू शकता :
अंगणवाडी कर्मचारी आंदोलन,4अंगणवाडी सेविकांना बडतर्फ. Anganwadi andolan
या शासन निर्णयामुळे होणारे अतिरिक्त फायदे :
1) साडी गणवेश : नवनिर्मित अंगणवाडीत केंद्रामधील 13011 अंगणवाडी मदतनीसना देखील सध्याच्या प्रचलित नियमानुसार साडी गणवेश करिता विहित केलेली रक्कम 1000 प्रति वर्ष प्रमाणे अनुदेय होणार.
2) अंगणवाडी प्रशासकीय खर्च मिळणार : या शासन निर्णयानुसार प्रस्तुत अंगणवाडी केंद्रकरता वार्षिक प्रशासकीय खर्च प्रति अंगणवाडी रुपये दोन हजार याप्रमाणे अनुदेय होणार.
3) मेडिसिन किट : प्रस्तुत अंगणवाडी केंद्राकरिता मेडिसिन किट करता प्रति अंगणवाडी केंद्र वार्षिक खर्च रुपये 1500 रुपये याप्रमाणे या शासन निर्णयाने खर्च अनुदेय करण्यात आला आहे.
4) फर्निचर सुविधा उपलब्ध : या शासन निर्णयानुसार प्रस्तुत अंगणवाडी केंद्रकरता केंद्र शासनाने निर्देश केल्याप्रमाणे प्रत्येक अंगणवाडी केंद्राला फर्निचर करता पाच वर्षातून रुपये 10000 इतका निधी अनुदेय होणार आहे.
मित्रांनो या शासन निर्णयामुळे अंगणवाडी केंद्रामध्ये खूप चांगले बदल निर्माण होतील. राज्यामध्ये जवळजवळ 520 अंगणवाडी सुपरवायझर पद भरती करण्यासाठी या शासन निर्णयाने मार्ग मोकळा झाला आहे. तसेच राज्यातील 13011 मिनी अंगणवाडी सेविकांना श्रीनिवर्धित वेतनाचा लाभ मिळणार आहे.
सदरचा शासन निर्णय तुम्ही महाराष्ट्र राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन डाऊनलोड करून विस्तृतपणे पाहू शकता. महाराष्ट्र राज्य शासनाचा महिला व बाल विकास विभागासाठीचा हा शासन निर्णय तुम्ही पीडीएफ स्वरूपात क्लिक करून पाहू शकता.
शासन निर्णय :अंगणवाडी शासन निर्णय
वरील शासन निर्णय डाउनलोड करून पाहू शकता .