visionvibe24.com

भारतरत्न पुरस्कार संपूर्ण माहीत मराठीतून !!!

भारतरत्न पुरस्कार

भारतरत्न पुरस्कार,हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान असून, भारताच्या राष्ट्रपती कडून प्रतिवर्षी साहित्य,कला, विज्ञान, सामाजिक व सार्वजनिक सेवा, कीडा अदीक्षेत्रात असामान्य आणि अद्वितीय कार्य करणाऱ्या महान नयींना प्रदान केला जातो .भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराची स्थापना 2 जानेवारी 1954 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांचे द्वारे केली गेली.

भारतरत्न पुरस्काराचे स्वरूप

भारतरत्न पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असल्यामुळे याचे स्वरूप, तांबे या धातूपासून बनवलेल्या पिंपळाच्या पानावर मध्यभागी सूर्याची आकृती प्लॅटिनम या धातूमध्ये चिन्हांकित केलेली असते.त्याखाली चांदी या धातूमध्ये “भारतरत्न” हे सफेद अक्षरांमध्ये नाव लिहिलेले असते.भारतरत्न पुरस्काराच्या मेडलच्या मागील बाजूला भारताचे राष्ट्र चिन्ह चार सिंहाची राजमुद्रा व आदर्श घोषवाक्य सत्यमेव जयते कोरलेले असते. साधारणपणे हे मेडल 5.8 से.मी लांबीचे,4.7से.मी रुंदीचे व 3 .1 मि.मि जाडीचे असते.

पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला

भारतरत्न पुरस्कार हा भारताच्या राष्ट्रपती द्वारे 26 जानेवारी च्या प्रजासत्ताक दिनी दिला जातो.पहिला भारतरत्न पुरस्कार भारताचे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकटरमन, आणि सी राजगोपालचारी या तिघांना 1954 साली दिला गेला. भारतरत्न पुरस्काराच्या 70 वर्षाच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत एकूण 49 व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला आहे. 2024 चा भारतरत्न पुरस्कार कर्पूरी ठाकूर यांना मिळाला आहे .

भारतरत्न पुरस्कार 2024 :

2024 सालचा भारतरत्न पुरस्कार केंद्र शासनाने 23 जानेवारी 2024 रोजी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना जाहीर केला.कर्पूरी ठाकूर हे बिहारचे पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री राहिले आहे. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी डिसेंबर 1970 ते जून 1971 तसेच पुन्हा जून 1977 ते एप्रिल 1979 या कालावधीमध्ये राहीले.तसेच बिहार मधील वंचित व मागास घटकांसाठी त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.

कर्पूरी ठाकूर यांना “जननायक”म्हटले जाते. ते स्वातंत्र्य सेनानी तसेच कट्टर समाजवादी विचाराचे होते.त्यांनी राममनोहर लोहिया,जयप्रकाश नारायण रामानंद मिस्त्रा अशा दिगज यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले.

ओबीसी( OBC )मध्ये समाविष्ट असलेल्या अत्यंत मागासवर्ग (Extremely backward class) अशा या नवीन सूचीबद्ध झालेल्या घटकासाठी काम केले.कर्पूरी ठाकूर यांनी 1978 मध्ये एक अभूतपूर्व आरक्षण मॉडेल सादर केले. यानुसार OBC, EBC,महिला आणि उच्च जातीतील आर्थिक दृष्ट्या मागास घटकांसाठी 26 % आरक्षण देण्यात आले.त्याचबरोबर करपुरी ठाकूर यांनी राज्यातील त्याला उर्दू आणि हिंदी भाषेला अधिकारीक भाषा म्हणून देण्याबरोबरच पंचायती राज व्यवस्था बळकटी करण्यासाठी विशेष स्वरूपातील प्रयत्न केले .

लालकृष्ण आडवाणी: सन 2024 साला मधील भारतरत्न पुरस्कार कर्पूरी ठाकूर यांचे नंतर भारतीय जनता ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना करण्यात आला . भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी याबद्दलची माहिती दिली .भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी यांचे योगदान मोठे आहे . यापूर्वी लालकृष्ण अडवाणी भारताचे उपपंतप्रधान देखील राहिलेले आहेत.राम मंदिराच्या आंदोलनामध्ये लाल कृष्ण आडवाणी यांनी एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे . म्हणूनच भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 3 फेब्रुवारी 2024 रोजी श्री लालकृष्ण अडवाणी यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्याचे जाहीर केले .

महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती

भारतरत्न पुरस्कार सुरू झाल्यापासून सर्वप्रथम 1958 साली महाराष्ट्रातील महर्षी धोंडो केशव कर्वे यांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातील आतापर्यंत एकूण नऊ व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे .

भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान मिळवणारा खेळाडू:

सचिन तेंडुलकर भारतरत्न पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू आहे . 2014 साली सचिन तेंडुलकर यांना क्रीडा क्षेत्रातील अद्वितीय योगदानाबद्दल भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . ‘क्रिकेटचा देव’म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर भारतरत्न पुरस्कार मिळालेला सर्वात तरुण व्यक्ती ठरला आहे .

तुम्ही वाचू शकता :

छत्रपती शिवाजी महाराज भाषण मराठी
Exit mobile version