आरोग्यदायी हुरडा(Hurada)!!!

आरोग्यदायी हुरडा(Hurada)!!! ( Healthy Hurada)

हुरड्याच्या हंगामामध्ये हुरडा(Hurada)खाल्ल्याने अनेक पोषक घटक यातून मिळतात. मधुमेही रुग्णांना हुरडा खाण्यास सांगितला जातो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हुरडा उपयोगी  ठरतो. हुरड्याच्या औषधी गुणधर्माचा शोध अद्याप झालेला नाही. मात्र चविष्ट व रुचकर असलेला हुरडा महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून खाल्ला जातो. महाराष्ट्रामध्ये तसेच भारतातील वेगवेगळ्या भागांमध्ये आवडीने हुरडा खाल्ला जातो.

हुरडा : महाराष्ट्रामध्ये हुरडा(Hurada)अत्यंत आवडीने खाल्ला जातो. हुरडा म्हणजे कोणतेही धान्य परीपक्व होण्यापूर्वी कोवळे दाणे,भाजून खाणे होय. साधारणपणे महाराष्ट्रामध्ये ज्वारीचा हुरडा फार आवडीने खाल्ला जातो. पचायला अत्यंत हलका,चविष्ट असा हुरडा महाराष्ट्रात खाल्ला नाही,असा कुणीही सापडणार नाही.

ज्वारीचे हिरवे दाणे जे कोवळे असतात, साधारणपणे परागीभवन झाल्यानंतर तीस- पस्तीस दिवसांचे असतात. परंतु नेहमीच ज्वारीच्या दाण्यापेक्षा या कोवळ्या धाण्याचा आकार थोडा मोठा असतो. हुरडा पोषणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरतो.

 

हुरडा(Hurada) रेसिपी : साधारणपणे हुरडा(Hurada) बनवण्यासाठी, कणसे आणली जातात. या कणसांना शेकोटी,निखारा किंवा गवऱ्यांच्या शेकोटीमध्ये चांगल्या प्रकारे भाजण्यात येते. त्यानंतर त्या कणसामधून दाणे वेगळे केले जातात. त्यावेळी तयार झालेला गरमागरम हुरडा खाण्यास अत्यंत चवदार आणि रुचकर लागतो. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये या हुरड्याबरोबर वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. यामध्ये साधारणपणे शेंगदाणा चटणी,दही, गूळ,साखर, वांग्याची भाजी या पदार्थांचा हुरड्या सोबत खाण्यासाठी केला जातो.

 

हुरडा(Hurada) खाण्याचे फायदे : हुरड्याच्या हंगामामध्ये हुरडा(Hurada)खाल्ल्याने अनेक पोषक घटक यातून मिळतात. मधुमेही रुग्णांना हुरडा खाण्यास सांगितला जातो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उडण्याचा उपयोग होतो. हुरड्याच्या औषधी गुणधर्माचा शोध अद्याप झालेला नाही. मात्र चविष्ट व रुचकर असलेला हुरडा महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून खाल्ला जातो. महाराष्ट्रामध्ये तसेच भारतातील वेगवेगळ्या भागांमध्ये आवडीने हुरडा खाल्ला जातो. यामुळे हुरड्याचे वेगवेगळे प्रकार देखील आढळतात.

हुरड्याचे प्रकार :

1) ज्वारीचा हुरडा

2) बाजरीचा हुरडा

3) गव्हाचा हुरडा

4) हरभरा हुरडा

ज्वारीचा हुरडा(Hurada) : महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ज्वारीचा हुरडा(Hurada)आवडीने खाल्ला जातो. पुणे- संभाजीनगर महामार्गावर देगाव परिसरामध्ये, ज्वारीच्या हंगामामध्ये लाखोंची उलाढाल हुरड्याच्या माध्यमातून केली जाते. विदर्भात देखील ज्वारीचा हुरडा आवडीने खाल्ला जातो.तसेच महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील ज्वारीचा हुरडा खूप मोठ्या प्रमाणात आवडीने खाल्ला जातो. महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटनाचा पेव  फुटल्यापासून हुरडा पार्टीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पुणे नाशिक, सोलापूर संभाजीनगर,अहमदनगर या जिल्ह्यामधील अनेक ठिकाणे हुरडा पार्टीसाठी प्रसिद्ध आहेत.

 

हुरडा(Hurada) संमेलन : इतिहासातील नोंदीनुसार राजा जयसिंग आणि राजस्थान मधील इतर काही राजे यांचे द्वारा 1734 मध्ये हुरडा(Hurada) संमेलन आयोजित केल्याचे आढळून येते. असेही म्हटले जाते की त्या काळामध्ये मराठ्यांनी उत्तरेमध्ये आपल्या पराक्रमाच्या जोरावर खूप मोठा भाग आपल्या अधिपत्याखाली आणला होता. त्याच वेळेस राजपूत राजांच्या लक्षात आले की मुघल सम्राट मराठ्यांचा विरोध करण्यास असमर्थ आहेत. अशा मराठ्याच्या साम्राज्याला विरोध करण्यासाठी एकत्र येऊन काहीतरी रणनीती ठरवण्यासाठी राजा जयसिंग व इतर राजपूत राजे यांनी हुरडा संमेलन केल्याचे इतिहासामध्ये आढळते.

तुम्ही वाचू शकता :या आरोग्यदायी रानभाज्या ,संजीवनी पेक्षा कमी नाही .

या हुरडा संमेलनामध्ये समाविष्ट असलेले राजे:

राजा जयसिंग – सवाईपूर

महाराणा जगतसिंह – मेवाड

राजा अभयसिंह -जोधपुर

राजा दुलाल सिंह – बुंदी

राजा गोपाल सिंह- करोली

या महत्त्वाच्या राजांसमवेत उत्तर भारतातील अनेक छोट्या मोठ्या राज्याच्या राजाने हुरडा संमेलनामध्ये भाग घेतला. त्यामुळे सन 1734 मध्ये झालेले हुरडा संमेलन इतिहासात विशेष प्रसिद्ध आहे.

हुरडा(Hurada) पार्टी near me: महाराष्ट्रामध्ये विशेषत:पुणे,नाशिक,सोलापूर,औरंगाबाद मध्ये वेगवेगळी ठिकाणे हुरडा पार्टी प्रसिद्ध आहेत. दरवर्षी या हुरडा पार्टीसाठी महाराष्ट्रातल्या तसेच भारतातील वेगवेगळ्या ठिकाणावरून पर्यटक येतात. ठिकाणी हुरड्याबरोबरच कृषी पर्यटनाचा अनुभव देखील घेतात. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हुरडा पार्टी पर्यटनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

हुरडा(Hurada) पार्टी near pune: महाराष्ट्रातील पुणे व पुणे परिसरातील हुरडा पार्टी साठी प्रसिद्ध असलेली काही ठिकाणे

1) कल्पतरू हुरडा बाग पार्टी पुणे

2) आनंदवन हुरडा पार्टी पुणे

3) पांजरपोळ हुरडा पार्टी पुणे

हुरडा पार्टी near नाशिक: नाशिक व नाशिक परिसरातील हुरडा पार्टीसाठी महत्त्वाचे ठिकाणे

1) हुरडा पार्टी इन नाशिक

2) पर्णकुटी हुरडा पार्टी नाशिक

हुरडा(Hurada)

हुरडा पार्टी near सोलापूर

हुरडा पार्टी near अहमदनगर

हुरडा पार्टी near औरंगाबाद

अशाप्रकारे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटकांना हुरड्याचा स्वाद देण्यासाठी तसेच कृषी पर्यटनाची ओळख करून देण्यासाठी हुरडा पार्टीचे आयोजन केले जाते. त्यासाठी वरील ठिकाणे विशेष प्रसिद्ध पावले आहेत. तर मित्रांनो अशा करतो आपणही अशाच प्रकारच्या ज्वारीचा हुरड्याच्या आस्वाद घ्याल.

 

Leave a comment