या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना juni pension yojanaलागू.

या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना juni pension yojana लागू . महाराष्ट्र राज्य शासनाचा महत्त्वाचा मंत्रिमंडळ निर्णय या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू.

juni pension yojana

दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्य राज्य शासनाच्या मंत्रिमंडळांनी एक महत्त्वाचा शासन निर्णय घेतला आहे. या मंत्रिमंडळ निर्णयानुसार नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर 2005 नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजना juni pension yojanaचा  पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

मित्रांनो या मंत्रिमंडळ निर्णयानुसार 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासन सेवेत नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा juni pension yojana पर्याय देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

मित्रांनो अशा शासकीय कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती अधिनियम, 1982, (महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाची अंश राशीकरण) 1984 व सर्वसाधारण भविष्यान निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदीत लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात येत आहे.

मित्रानो संबंधित राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी जुनी निवृत्तीवेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा हा पर्याय याचा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीत देणे बंधनकारक राहील जे राज्य शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी या सहा महिन्यांच्या कालावधीतील जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा पर्याय देणार नाही. आशा कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित औषधांत निवृत्तीवेतन योजना लागू राहील अधिकारी व कर्मचारी यांनी प्रथम दिलेला पर्याय अंतिम राहील.

तसेच मित्रांनो जुनी निवृत्तीवेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नियुक्ती प्राधिकरणाकडे सादर करावा. हा कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू होण्यास पात्र झाल्यास तशा पद्धतीचे कार्यालयीन आपण संबंधित निवृत्ती प्राधिकार्‍यांनी पर्याप्त झाल्याच्या दिनांक पासून दोन महिन्याच्या आत द्यावे.

तसेच संबंधित कर्मचारी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन एनपीएस योजनेचे खाते तात्काळ बंद केले जातील. तसेच जे अधिकारी व कर्मचारी जुनी निवृत्तीवेतन juni pension yojana व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांची भविष्य निर्वाह निधीचे खाते(GPF) उघडण्यात येईल व सदर खात्याचा नवीन परिभाषित औषधांनी वृत्ती वेतन खात्यातील त्यांच्या हिश्याची रक्कम व्याजासह जमा करण्यात येईल.

 तसेच मित्रांनो जुनी निवृत्तीवेतन juni pension yojana व अनुषंगिक नियम हा पर्याय स्वीकारणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नवीन परिभाषित अंशदान  निवृत्तीवेतन खात्यातील एनपीएस राज्य शासनाचे यशाची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात येईल.

 म्हणजेच मित्रांनो आज पर्यंत शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या खात्यावर राज्य शासनाचा जो हिस्सा जमा झालेला असेल तो पुन्हा शासनाच्या एकत्रित निधीमध्ये टाकण्यात येईल. या संदर्भातील सविस्तर मंत्रिमंडळ निर्णय तुम्ही या ठिकाणी खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता. सदरील मंत्रिमंडळ  निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य शासनाच्या वित्त विभागासाठी निर्गमित केला आहे.

juni pension yojana

 

1 thought on “या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना juni pension yojanaलागू.”

Leave a comment